पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला कोरोनाचा विळखा बसला होता. पण आता कोरोनाचा जोर ओसरतांना दिसत आहे. मात्र, आता आणखी एक मोठं संकट पिंपरी चिंचवडकरांच्या मागे लागलं आहे. एका तरुणीवर कुत्र्यांच्या घोळक्याने हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हा प्रकार हिंजवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडला आहे. ही मुलगी पार्किंगमधून बाहेर जात होती. त्यावेळी अचानक एकाच वेळी सहा कुत्र्यांनी मुलीवर भीषण हल्ला केला. सहा कुत्र्यांनी अक्षरश: या मुलीचे लचेक तोडत होते. तिने जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे तिथे असलेल्या सुरक्षारक्षकाने काठी घेऊन धाव घेतली आणि तिची सुटका केली. ज्या मुलीवर हल्ला केला तिच्या शरीरावरील जखमा भीतीदायक आहेत.
तर दुसऱ्या एका घटनेमुळे कुत्र्यांचा एक घोळका अचानक समोर आल्यामुळे दुचाकीवरून घसरून पडून आनंद पुजारी नामक व्यक्तीचा नाहक बळी गेला.
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी ते आळंदी परिसरात राहणाऱ्या प्रत्यक नागरिकांनी कुत्र्यांची धास्ती घेतली आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिक जीव मुठीत धरून वावरताना दिसत आहे.























Join Our Whatsapp Group