पिंपरी (Pclive7.com):- भारतीय व महाराष्ट्र राज्य हवामान विभाग यांनी पुढील ४ ते ५ दिवस माेठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे मावळ तसेच पिंपरी चिंचवड शहरातून वाहणारी पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावांना तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरूवात झाली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातुन केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात साेडावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना नदी तीरावरील सर्व गावातील, शहरातील नागरीकांनी सर्तक रहावे.
नदी तीराजवळील आपली वाहणे, पाणी उपसा पंम्प व इतर साधनसामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याची दक्षता घेण्यात यावी. जेणे करुन कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही व जलसंपदा विभागास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group