पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारुन ८ हजार रोख आणि इतर साहित्य असे ३६ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर क्लब चालविणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकासह सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हा छापा आणि कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि.१७) रात्री पावणे दहाच्या सुमारास केली. भोसरी, कासारवाडी येथील हॉटेल सर्जाच्या पाठीमागे असलेल्या एका कौलारु घरात पत्त्यांचा क्लब सुरु असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रात्री पावणे दहाच्या सुमारास छापा मारला. यावेळी तीन पत्ते जुगार खेळताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी रोकड जप्त केली आहे आणि स्वतःच्या फायद्यासाठी क्लब चालविणाऱ्या स्वीकृत नगरसेवकासह सात जणांना सीआरपीसी कलम 141 (अ) 1 प्रमाणे नोटीस आणि समज दिली आहे.






















Join Our Whatsapp Group