पिंपरी (Pclive7.com):- बालाजीनगर चौक, भोसरी येथे एका टोळक्याने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी सोशलमिडीयावर फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आठवड्यानंतर ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अन्य २ ते ३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विशाल काळे यांनी रविवारी (दि. १८) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तलवारीने केक कापण्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास बालाजीनगर चौक, टेल्को रोड, भोसरी येथे घडली. आरोपीचा वाढदिवस असल्याने त्यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचे प्रदर्शन केले. या घटनेला घडून तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या वाढदिवसाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यापूर्वी राजरोसपणे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तथाकथित दादा-भाईंना पोलिसांनी खाकीचा प्रसाद दिला आहे. त्यामुळे मधल्या काही कालावधीत हे प्रकार बंद झाले होते.






















Join Our Whatsapp Group