पिंपरी (Pclive7.com) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय सर्वसाधारण रुग्णांसाठी खुले करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
महापापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालय कोवीडसाठी वापरले जात आहे. ते सर्वसाधारण रुग्णांसाठी लवकरात लवकर खुले करावे. खासगी रुग्णालयांत गोर गरीबांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.
छोट्या – छोट्या आजारांसाठी मोठ्या रकमेची बिले आकारली जात आहेत. कोरोना व मंदीच्या काळात अर्थ चक्र अडकल्याने गोर गरीबांनी पैसे आणायचे तरी कोठुन, असा सवाल त्यांच्यापुढे आहे. आयुक्त हर्डीकर यांनी लवकरात लवकर सर्वसाधारण रूग्णांसाठी वायसीएम खुले करावे. त्यामुळे गरीब जनतेला दिलासा मिळेल, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group