पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने नवरात्र उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा व युवतींचा (९ दुर्गांचा) या निमित्ताने साडी- चोळी, पुस्तक, शाल तसेच श्रीफळ देऊन सन्मान केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरेंद्र बहल, राखी धर, अपर्णा मिसाळ, गंगा धेंडे, कविता खराडे, पल्लवी पांढरे यांच्या हस्ते सन्मान केला. युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यांना रूतुजा बिराजदार, गीता मोरे, शलाका बनकर, हिना अत्तार, स्नेहल लायगुडे, नयन पाटील युवतींनी सहकार्य केले.
आशा साळवी (पत्रकार), डाॅ.पौर्णिमा कोल्हे (शिक्षण क्षेत्र), डाॅ. तेजश्री कपोते (डाॅक्टर), रेश्मा गायकर (ट्रॅफिक पोलिस), रूतुजा साबळे (नर्स), अश्विनी बंसल (वकिल), स्नेहल ढोरे (व्यवसाय), रेणुका कांबळे (सफाई कर्मचारी) आणि सुनिता मुदलियार (घरकाम) या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group