मावळ (Pclive7.com):- मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शंकरराव शेळके कौतुकास्पद कार्य केले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी आजपर्यंत मिळालेले त्यांचे संपूर्ण वेतन तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी आमदार शेळके नेहमी प्रयत्नशील असतात. शेळके यांचा वर्षभराचा पगार सुमारे १६ लाख ९८ हजार रुपये इतका आहे. गरीब व होतकरु मुलांना या शैक्षणिक मदतीचा नक्कीच फायदा होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा असे आवाहन त्यांनी या आधीच केले होते.
शिक्षण हे देशाचे भवितव्य घडवणारी अतिशय जमेची बाजू आहे. पण आजही सर्वसामान्य कुटुंबातील गरजू, आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणी उभ्या राहत आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी वाढदिवसाच्या आधी केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक ठिकाणी शैक्षणिक मदत केली आहे. पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
अशा सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बळ देण्याचा शेळके यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आमदार झाल्यापासूनचे सर्व वेतन स्वेच्छेने शैक्षणिक मदत म्हणून देत आहे, असे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.






















Join Our Whatsapp Group