पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजू बनसोडे, प्रविण भालेकर, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.
उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज सोमवार (दि.०२) रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत होती. तर शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे.
दरम्यान भाजपकडून केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संख्याबळानुसार केशव घोळवे यांची निवड निश्चित मानली जात आहे. आता ६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून राष्ट्रवादी माघार घेणार की निवडणुक होणार हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.






















Join Our Whatsapp Group