पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपाकडून केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक एकनाथ पवार, तुषार हिंगे, बाबासाहेब त्रिभुवन, मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, योगिता नागरगोजे, आदी उपस्थित होते.
उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज सोमवार (दि.०२) रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत होती. तर शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. भाजपकडून केशव घोळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संख्याबळानुसार केशव घोळवे यांची निवड निश्चित मानली जात आहे. आता ६ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून विजयी कोण होणार हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.






















Join Our Whatsapp Group