पिंपरी (Pclive7.com):- ‘एक पणती’ घरकाम करणार्या भगिनींसाठी… या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष ऋतुजा बिराजदार, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर हिना आत्तार, उपाध्यक्ष- स्नेहल लायगुडे, सरचिटणीस शलाका बनकर यांनी कोरोनाच्या या काळात सर्वाधिक बेरोजगार झालेल्या सांगवी परिसरातील घरकाम करणार्या महिलांना या बेरोजगारीच्या काळात सामाजिक जाणीव ठेवत कर्तव्य म्हणून दिवाळीची भेट देण्यात आली. यामध्ये दिवाळीचा फराळ पणत्या आकाशकंदील तसेच दिवाळी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, शहर प्रवक्ते फजल शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती अध्यक्ष वर्षा जगताप, सोशल मीडिया सरचिटणीस निलेश पुजारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती गीता मोरे, नेहा पडवळ, सारिका ढमे, शीतल देशमुख, तृप्ती गोरे व तनिष्का व्यासपीठ सांगवी समन्वयिका राधिका घोडके, सुजाता निकाळजे, जयश्री वगणवार, राजश्री पोटे, संगीता कुसाळकर, मनीषा पुरी आदी महिला उपस्थित होत्या.






















Join Our Whatsapp Group