भोसरी (Pclive7.com):- भोसरीतील प्रज्योत फुगे प्रतिष्ठानच्यावतीने ११ हजार नागरिकांना पणत्यांचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी युवानेते प्रज्योत फुगे तसेच प्रज्योत फुगे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
भोसरीतील प्रज्योत फुगे प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. कोरोना महामारीच्या काळातही प्रतिष्ठानच्यावतीने अनेक गरजूंना मदतीचा हात देण्यात आला होता.
कोरोना संकटाच्या अंधकारातून ही दिवाळी प्रकाशमय जावो त्या निमित्ताने भोसरीतील शितल बाग, आपटे कॉलनी, सेंचुरी इन्का कॉलनी, ऊसव् होम, खंडोबामाळ, दिघी रोड, गवळीनगर, भोसरी गावठाण या परिसरातील नागरिकांना तब्बल ११ हजार पणत्यांचे वाटप करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group