पिंपरी (Pclive7.com):- निगडी येथील बसस्टॉप जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांनी मंगळवारी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तब्बल ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त करत २४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विजय शंकर रोमन (वय ४८), मुन्ना उर्फ विजयकुमार महादेव शर्मा (वय ३५), शरद सुभाषचंद केसरवानी (वय ३२) यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ असलेल्या बस स्टॉपच्या मागील बाजूच्या गाळ्यांमध्ये काहीजण ऑनलाइन लॉटरी जुगार अड्डा चालवत होते. निगडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला.
पोलिसांनी या छाप्यामध्ये ५५ हजार ३० रुपये रोख रक्कम, ६३ हजार ४०५ रुपयांचे जुगाराचे साहित्य, एक लाख ४ हजारांचे १३ मोबाईल फोन, एक लाख ९५ हजारांच्या ६ दुचाकी असा एकूण ४ लाख १७ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगार अड्ड्यावर २० जण जुगार खेळत होते. पोलिसांनी ऑनलाइन लॉटरी जुगार अड्डा चालवणाऱ्या चार जणांसह जुगार खेळणाऱ्या २० लोकांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. एन. सोनवणे, पोलीस उप निरीक्षक महेंद्र आहेर, केरबा माकणे, सहाय्यक फौजदार मछिंद्र घनवट, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतिश ढोले, शंकर बांगर, शिवाजी नागरगोजे, विनोद व्होनमाने, अमोल सांळूखे, विजय बोडके, उमेश मोहीते, सोपान बोधवड, कंठय्या स्वामी यांनी केली आहे.



















Join Our Whatsapp Group