पिंपरी (Pclive7.com):- भारताच्या पहिल्या माहिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून ‘वृध्द सेवा’ उपक्रम आयोजित करण्यात आला.
बिजलीनगर येथील संत मोनीबाबा आनंद आश्रम येथे शहर युवक काँग्रेसच्या वतीने दैनंदिन स्वंयपाकासाठी आवश्यक असलेले साहित्य व अन्नधान्य देऊन वृध्द सेवा उपक्रम राबविण्यात आला.
२० किलो साखर, १० किलो मैदा, १० किलो शेंगदाणे, १० किलो मसूर डाळ, ५ किलो छोले, पापड व बिस्किटांची पाकिटे असा जिन्नस देण्यात आला. या प्रसंगी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले व आभार मानले.
यापूर्वी सकाळी ११ वाजता बीआरटी रोड काळेवाडी येथील मनपा आरोग्य कार्यालयात स्व.इंदिराजींची प्रतिमा युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते भेट देण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव कौस्तुभ नवले, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, दिपक भंडारी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव व निलेश वाघमारे आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group