पिंपरी (Pclive7.com):- घर देण्यास नकार दिल्यानं मुलगा सुनेसह सुनेच्या आई-वडिलांनी वृद्धेला बेदम मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे घडली.
अशोक महादेव वाघमारे (वय ४०), प्रीती अशोक वाघमारे (वय ३५, दोघेही रा. पडवळनगर, थेरगाव) यांच्यासह प्रीतीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सिताबाई महादेव वाघमारे (वय ६५, रा. पडवळनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली. आरोपी अशोक हा फिर्यादीचा मुलगा असून, प्रीती ही सून आहे. मंगळवारी (ता.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास अशोक, प्रीती व प्रीतीचे आई-वडील हे फिर्यादीच्या घरी आले.
‘तू राहच्या घराच्या ठिकाणची जागा व बांधलेल्या खोल्या आम्हाला दे, आम्ही तुला मरेपर्यंत संभाळू’, असे फिर्यादीस म्हणाले. मात्र, फिर्यादीने त्यास नकार दिल्याचा राग आल्याने मुलगा व सूनेनं फिर्यादीचे डोके भिंतीवर आपटून त्यांना जखमी केले. तसेच सुनेच्या आई-वडिलांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये त्या जखमी झाल्या. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group