पिंपरी (Pclive7.com):- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१९) रोजी संध्याकाळी ७ वाजता चिंचवडगाव येथे बैठक पार पडली. यावेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मनसेच्या दोन्ही उमेवारांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे पदवीधरसाठी रुपालीताई पाटील (ठोंबरे) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच प्रा.विद्यानंद मानकर (सर) यांना पुणे शिक्षक मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन उमेदवार मनसेच्या वतीने देण्यात आले आहे.
चिंचवड येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये उमेदवार प्रा.विद्यानंद मानकर सर (पुणे शिक्षक मतदार संघ)हे उपस्थित होते. प्रा.विद्यानंद मानकर (सर) यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केले. या निवडणुकीत विजय हा आपला पक्का असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला पिंपरी चिंचवड शहर मनसेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले, बाळा दानवले, राजु सावळे, विशाल मानकरी , हेमंत डांगे , दत्ता देवतरासे, सुरेश सकट, निलेश नेटके, अनिल बुजबळ, तेजस दाते, अलेक्स आप्पा आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group