पिंपरी (Pclive7.com):- आमदार महेश लांडगे व नगरसेवक विकास डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त दिघीगाव विठ्ठल मंदिरात नाभिक सेवा संघ दिघी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ सचिव सागर आढाव व रेड प्लस ब्लड बँक यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
या शिबीराचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ९३ युनिट रक्तदान झाले. या कार्यक्रमात महेश लांडगे, ‘इ’ प्रभाग सभापती तथा नगरसेवक विकास डोळस, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, नगरसेवक सागर गवळी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, संजय गायकवाड, पुंडलीक सैनदाने, युवानेते उदय गायकवाड, कुलदीप परांडे, पिनु डोळस, दत्तात्रय परांडे, विकी अकुलवार, ज्ञानेश्वर आढाव, रमेश विरणक, नामदेव रढे, बाळासाहेब सुपे, भीष्म गायकवाड, अशोक पंडित, हरिभाऊ शेळके, दत्तात्रय शेळके, संतोष पंडित, नागेश भोपुलकर, संतोष शिंदे, दत्तात्रय आढाव, पंढरीनाथ पंडित, राजू भोसले, आमसिद्ध भिसे तसेच नाभिक सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाभिक सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group