पिंपरी (Pclive7.com):- मराठवाडा जनविकास संघातर्फे दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमाने प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना चषक देवून गौरविण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघ पिंपळेगुरव यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गड किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमाचा प्रथम, सांगवीमधील शिक्षक सोसायटीचा द्वितीय, तर तृतीय क्रमांक शांताराम बाईत प्रतिष्ठान यांनी मिळविला.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, पोलीस नाईक रोहीदास बोऱ्हाडे यांच्या हस्ते भव्य चषक देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
तसेच स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघांना पदक देऊन गौरविण्यात आले. अनाथ आश्रमातील मुलांना उबदार ब्लॅकेट देण्यात आले. सर्व मुलांनी एकत्र फराळाचा आनंद घेतला. सर्व शाळांमध्ये गड किल्ल्यांची सहल आयोजन करावे, तरच मुलांना गड किल्लेची जास्त माहिती मिळेल, असे अरुण पवार यांनी सांगितले.
सहायक पोलीस फौजदार राम पवार, पोलीस नाईक गणेश धामणकर, रवींद्र बाईत, ह.भ.प. पुरूषोत्तम वाघमारे, पितामह भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णा खडसे, देविदास सुरवसे यावेळी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group