पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संविधान दिनानिमित्त काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, नेहरूनगर येथील क्रांती चौकात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाच्या प्रतिमाचं पुजन व संविधान प्रस्तविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमापुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना अशोक मोरे म्हणाले, “भारतीय संविधान हे जगविख्यात व सर्वात वेगळे असे सर्वधर्मसमभाव मारणारे व लोकशाही चे मुख्य स्त्रोत असलेले आहे. जनतेने जनतेकडून जनतेसाठी चालविलेले राज्य लोकशाही ठरते व त्यांच लोकशाही ला साचेबद्ध स्वरूपात देशाला बहाल केले गेले तो आजचा संविधान दिन आहे. विविध भाषा, विविध प्रांत, विविध जाती, धर्म पंथ, परंपरा या सर्वांना एक संघ ठेवणारे भारतीय संविधान आज जगात महान ठरले आहे”.
नरेंद्र बनसोडे म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नतंर देशाची वाटचाल व जडणघडण ठरविण्यासाठी व देशाला प्रगतीची योग्य दिशा देण्या करिता संविधानाची गरज होती व या कामी राष्ट्रपित्याची मोलाची भुमिका बजावत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक मानवतेवर आधारित व समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूता या मु्ल्यांवर आधारित संविधान दिले तोच आजचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर व ज्या दिवशी हे संविधान अंमलात आले तो दिवस म्हणजे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन झाला. विविधतेत एकता या आश्चर्य कारक अशा संकल्पनेची प्रचीतीच आपणांस भारतीय संविधानातून मिळते”.
कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे यांनी केले.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सामाजिक कार्यकर्ते फारूख ईनामदार, भाऊसाहेब आडागळे, गवळी गुरूजी,पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अमर नाणेकर,मिंलिद बनसोडे, आप्पा अहिवळे आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group