पिंपरी (Pclive7.com):- थरमॅक्स चौकाजवळ सुरू असलेल्या स्पा सेंटरवर निगडी पोलीसांचा छापा टाकला आहे. त्या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक तानाजी ऊर्फ राजेश व्यंकट कानुरे (वय.३२ वर्षे, रा.रूपीनगर निगडी) याला अटक केली असून ३ मुलींची सुटका केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरमॅक्स चौक येथील हुद्याई शोरूमच्या पाठीमागे असलेल्या सुमन मॉलमध्ये ऑन टाईम ब्युटी अँन्ड स्पा मसाज सेन्टर आहे. या स्पा सेंटरचा मालक स्वतःच्या फायदयासाठी येथे वेश्याव्यवसाय चालवत असल्याची पोलीसांना मिळाली.
याबाबतची खात्री करून पोलीसांनी शनिवारी (दि.१२) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या स्पा मसाज सेन्टरमध्ये बनावट गिराईक पाठवले. त्यानंतर याठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ पंचाना सोबत घेवून येथे छापा टाकला.
या छाप्यात स्पा सेंटरचे मालक तानाजी ऊर्फ राजेश व्यंकट कानुरे, मॅनेजर व ३ महिला मिळून आल्या. त्यानंतर स्पा सेंटरच्या मालकाला ताब्यात घेवून चौकशी करून त्यांच्या विरूध्द निगडी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७०,३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात स्पा सेंटरचे मालकास अटक करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून ३१ हजार १५० रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तेथील ३ मुलींची सुटका केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, मा.अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०१ मंचक इप्पर, सहा पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकणे, सहा पोलीस फौजदार मच्छिद्र घनवट, पोलीस हवालदार सतिश ढोले, महिला पोलिस हवालदार परविन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, सोपान बोधवड, दिपक जाधवर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group