पिंपरी (Pclive7.com):- हातकणंगलेेचे माजी आमदार राजू आवळे यांच्या मुख्य प्रवेशानंतर शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय लहुजी पॅथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय लहुजी पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश प्रक्रिया पार पडली.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील, नामदार हसन मुशरिफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मफलर घालून युवराज भगवान दाखले यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय लहुजी पॅन्थरच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भारतीय लहुजी पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे आणि प्रदेश संघटक युवराज दाखले यांच्या हस्ते लहु मुद्रा भेट देण्यात आली.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ आणि भारतीय लहुजी पॅन्थरचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group