पिंपरी (Pclive7.com):- वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका किराणा मालाच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा आढळला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून तब्बल २ लाख ४३ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भवरलाल नारायणलाल चौधरी (वय ४५, रा. वाल्हेकवरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक महेश बारकुले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भवरलाल याचे वाल्हेकरवाडी येथील एका चौकात किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास दुकानावर छापा मारून कारवाई केली.
या कारवाईमध्ये पोलिसांनी दुकानातून २ लाख ४३ हजार १४९ रुपयांचा विमल पान मसाला गुटखा, १७ हजार ८४५ रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ६ हजार ९९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा.पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ.अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके व सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अनंत यादव, संतोष असवले, नितीन लोंढे, सुनिल शिरसाट, संदीप गवारी, पोलीस नाईक भगवंता मुठे, महेश बारकुले, अनिल महाजन, दिपक साबळे, अमोल शिंदे, गणेश कारोटे, मारुती करचुंडे, विष्णु भारती, पोलीस शिपाई राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगीता जाधव, महिला पोलीस शिपाई योगिनी कचरे, सोनाली माने यांनी केली.





















Join Our Whatsapp Group