पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.२२) भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या निगडीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तसेच स्नेहभोजन केले. या भेटीतून देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ अमित गोरखे यांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट होत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शहर दौ-यावर होते. त्यांनी भाजप प्रदेश सचिव गोरखे यांच्या निगडीतील घरी सदिच्छा भेट दिली. गोरखे परिवारासोबत स्नेहभोजन घेतले. त्यांच्यासोबत माजी मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन, नगरसेविका अनुराधा गोरखे, डॉ. प्रिया गोरखे उपस्थित होते.
गोरखे यांनी प्रभू श्रीराम यांची मूर्ती व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे विचारधन अर्थात त्यांच्या साहित्याचा संच फडणवीस यांना भेट दिला.
अमित गोरखे हे भाजप पक्ष आणि फडणवीस यांच्याशी निष्ठा राखून आहेत.फडणवीस यांचे विश्वासू म्हणून गोरखे यांची ओळख आहे. त्यांचे अतिशय घनिष्ट संबंध आहेत. मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते असूनही फडणवीस यांची कार्यकर्त्यांशी नाळ जोडली गेलेली आहे. या भेटीतून गोरखे यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.
फडणवीस यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची जबाबदारी गोरखे यांच्याकडे दिली होती. गोरखे हे मातंग समाजाचे नेते असून फडणवीस यांचे खास विश्वासू आहेत.





















Join Our Whatsapp Group