पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १ लाख ८७ हजार ९७० बालकांना आज लसीकरण देण्यात आले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनानुसार आज (दि.३१) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे मार्गदर्शनाखाली वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले. सन १९९५ पासून आयोजीत होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे हे २६ वे वर्ष आहे. या कालावधीत मनपा क्षेत्रात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही.
मोहिमेचा उद्घाटन समारंभ महापौर सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांचे शुभहस्ते मनपाच्या सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये संपन्न झाला. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशेरकुमार हांडे, डॉ. सुप्रिया बिरादार, डॉ. श्रद्धा कोकरे, डॉ. तुषार जाधव, डॉ. अल्वी नासीर, डॉ. कुंदन पाटील, डॉ. गोविंदा नरके, कार्यक्रम अधिकारी डॉ. चैताली इंगळे, सांगवी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी , सौ. शोभा ढोले, पी.एच.एन. पिंपरी चिंचवड मनपा हे उपस्थित होते.
महापालिका परिसरात १०१९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ प्रभारी वैद्यकीय अधिकारी रुग्णालय व ५५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २१५ पर्यवेक्षक, ३०४२ लसीकरण कर्मचारी नेमून लसीकरण करण्यात आले होते. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी टाटा मोटर्स स्वयंसेवक, रोटरी क्लबचे अध्यक्ष व स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्ल्यू, एएनएम, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा व इतर विविध स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण १०१९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व मनपा दवाखाने रुग्णालये, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९०८ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी ३८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ७३ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. मोहिमेचा प्रचार स्लीप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉलपेंटींग इ. माध्यमाद्वारे करण्यात आला आहे. मोहिमेसाठी ५५ वैद्यकीय अधिकारी, २१५ पर्यवेक्षक व ३०४२ लसीकरण कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोहिम यशस्वी करण्यात नगरसेवक, सर्व रोटरी क्लब अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनिल जॉन (तालेरा रुग्णालय), डॉ. प्रकाश ताडे (यमुनानगर रुग्णालय), डॉ. शैलजा भावसार (भोसरी रुग्णालय), डॉ. तृप्ती सागळे (जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय), डॉ. विजया आंबेडकर (प्रभारी वैद्यकीय अधिकारी-सांगवी रुग्णालय), डॉ. संगीता तिरुमणी (जिजामाता रुग्णालय), डॉ. सुनिता साळवे (आकुर्डी रुग्णालय), डॉ. सुनिता इंजिनियर (थेरगांव रुग्णालय) व त्यांचे सर्व सहकारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी , टाटा मोटर्स स्वयंसेवक , बालवाडी शिक्षिका, बचतगट, अंगणवाडी सेविका व मदतनिस यासर्वांचे सहकार्य लाभले.
दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पासून मनपा कार्यक्षेत्रातील ५ वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण झाले आहे, याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणीत केलेली आहे. तसेच लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षीत आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांना दि. ३१ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण झाले नसेल त्यांना घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापौर व आयुक्तांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group