पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील एम्पायर इस्टेट मधील सेंट मदर टेरेसा पुलाखालील मोकळ्या जागेत विकसीत करण्यात येणा-या विविध सुविधांचा नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगला उपयोग होईल. कोरोना काळात नागरिकांनी चांगले सहकार्य केले. कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
आज प्रभाग क्र.१९ मधील एम्पायर इस्टेट येथील पुलाखालील जागेत सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर माई ढोरे यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसदस्य शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे, शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, कोमल मेवानी, माजी नगरसदस्य प्रसाद शेट्टी, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता रविंद्र सुर्यवंशी, अशोक कुटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि या भागातील नागरिक उपस्थित होते.
एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर टेरेसा पुलाखालील मोकळ्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज विरंगुळा केंद्र, वाहनतळ, उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे १० कोटी ९८ लाख रुपये इतका खर्च येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.






















Join Our Whatsapp Group