पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडु दत्तक योजना जाहीर केली आहे. यांमध्ये ११ खेळांचा समावेश केला आहे. परंतु बुद्धीबळ व कॅरम या खेळास या योजनेत स्थान दिलेले नाही.
या खेळांना खेळाडु दत्तक योजनेत सहभागी करून घ्यावे अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात क्रीडा विभागाचे उपआयुक्त संदीप खोत यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, चंद्रशेखर जाधव, सेवादलचे मकरधवज यादव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, पिंपरी विधान सभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विवेक भाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.