पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएल भोसरी आगारच्या वतीने रक्तदान शिबिर भोसरीतील बीआरटी स्टँड येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शिवरायांच्या मूर्तीला पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या शिबीरात १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी कोविड योद्धा डॉक्टर, पोलीस व समाजसेवक यांचा सत्कार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केला. यावेळी सर्व रक्तदात्यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड महापालिका महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांचा सत्कार आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास पीएमपीएमएल भोसरी आगारचे प्रमुख रमेश चव्हाण, नगरसेवक सागर गवळी, रवी लांडगे, प्रियंका बारसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हिंदवी स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष गणेश गवळी व त्यांचे सर्व कार्यकर्ते व सर्व कामगारांनी स्वागत केले. माजी महापौर नितीन काळजे हे देखील यावेळी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group