पिंपरी (Pclive7.com):- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष गोविंदराव जाधव यांचे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे वय 73 होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गोविंदराव जाधव 15 वर्ष देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक होते. त्यांनी उपाध्यक्षपद देखील भूषविले होते. गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे पंचकृषीतील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तीर्थक्षेत्र देहूगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांचे वडील तर शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे सासरे होत.






















Join Our Whatsapp Group