पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे फ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष विद्यमान नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोविड लसीकरण केंद्रावर असणाऱ्या परिचारिका, डॉक्टर व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
कुंदन गायकवाड यांच्या वतीने भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात शिवजयंती निमित्त वॉटरफिल्टर बसविण्यात आले.
त्यामुळे नागरिकांना केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रभावीपणे महानगरपालिका वतीने राबविण्यात येत आहे. लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची नागरिकांना तसेच डॉक्टर व नर्स, परिचारिका यांना अडचण निर्माण होत होती. ही अडचण निदर्शनास येताच नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या सर्व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रावर वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहे.
शिवजयंतीचे औचित्य साधून एकूण आठ लसीकरण केंद्रावर हे वॉटर फिल्टर बसविण्यात आले. यामुळे पिण्याच्या पाण्याची सुविधा नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
यावेळी नगरसेविका साधना मळेकर, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, डॉ.रामनाथ बचाव, उद्योजक मारुती मामा जाधव, निर्मलाताई जाधव, युवा नेते संदीप शेलार, गणेश तरटे, तुषार हजारे, वैभव साने, तुकाराम जाधव आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group