पिंपरी (Pclive7.com):- सध्याच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढत आहे. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या दवाखान्यांवर ताण येत असून नाईलाजाने नागरिकांना खासगी हॉस्पटलमध्ये उपचार घ्यावा लागत आहे.
अशावेळी रूग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्माची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. प्लाझ्मा या लढ्याचं प्रमुख शस्त्र मानलं जात आहे. त्याचा वापर करुन कोरोनाग्रस्त व्यक्तींना बरे करता येणे शक्य आहे. परंतु आता प्लाझ्माची कमतरता जाणवत आहे. अश्यावेळी लोकांचा कल हा महानगरपलिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीकडे जास्ती आहे.
कोरोनाच्या काळात आर्थिक दृष्ट्या फटका बसलेल्या लोकांकडे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार ६ हजार रुपये भरावे लागत आहे. तरी हा अधिकचा खर्च गोरगरिब रुग्णांना परवडणारा नसून सदर बाबतीत आयुक्तांनी लक्ष घालून पूर्वी प्रमाणे ४०० रुपयांत प्लाझ्मा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली.
महापालिका प्रशासनाने असा निर्णय घेतल्यास कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक बळकट करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरेल अशी भावना युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ह्यावेळी महापौर माई ढोरे, संकेत चोंधे, दिनेश यादव, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, पूजा आल्हाट, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group