पिंपरी (Pclive7.com):- नियमबाह्य कर्ज मंजूर करून बॅंकेची पावणे सहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अमर मुलचंदाणी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१५ ते २०२१ दरम्यान दि सेवा विकास को. ऑपरेटिव्ह बॅंक, पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला.
याप्रकरणी विजयचंद गोपीचंद रामचंदानी (वय ५२, रा. पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि.०२) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी नगरसेवक अमर मुलचंदाणी यांच्यासह सतरा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य कर्ज मंजूर केले. आरोपींनी कर्जाचे हप्ते थकवून बॅंकेची पावणे सहा कोटींची फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे अधिक तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group