पिंपरी (Pclive7.com):- राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊनचे आदेश सरकारने दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचे निर्बंध झुगारून दारू विक्री केल्या प्रकरणी रहाटणीच्या कोकणे चौक येथील कराची बिर्याणी हाऊस पोलीसांकडून ‘सील’ करण्यात आले. वाकड पोलिसांनी मंगळवारी (दि.२७) ही कारवाई केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणीतील कोकणे चौक येथील कराची बिर्याणी हाऊस येथे कोरोनाचे निर्बंध झुगारून विनापरवाना दारू विक्री केली जात होती. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्यास पोषक वातावरण तयार झाले होते. यासंबंधी वाकड पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे बिर्याणी हाऊस बंद करण्याबाबत वाकड पोलिसांनी महापालिकेला अहवाल दिला. त्यानंतर वाकड पोलिसांच्या कारवाई करत हे हॉटेल सील केले आहे.






















Join Our Whatsapp Group