पिंपरी (Pclive7.com):- कोरोना संसर्ग आणि त्यापार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फ्रिडम लाईफ फाउंडेशनतर्फे दररोज १ हजार टिफिनचे मोफत वाटप केले जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील गरीब व गरजू लोकांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
फाउंडेशन मार्फत गरीब व गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांना मोफत टिफिन वाटप केले जात आहे. १५ एप्रिल रोजी हा उपक्रम सुरू केला असून, परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश कर्चे, उपाध्यक्ष शैलजा चौधरी, सचिव विजया भामरे, ज्योती आवटे, सविता नांद्रे, उर्वशी गाढवे, काशिनाथ शेलार, गौरव सावंत, संतोष चोंदे, सौरभ सावंत, किरण रणखांबे, डॉ. अभय निकम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group