पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सचिन राकेश सौदाई टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे. सचिन राकेश सौदाई यांच्यासह सात जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, कट रचुन दरोडा घालणे, अपहरण, खंडणी मागणे, दुखापत, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग व बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण १५ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत.
या कारवाईत टोळी प्रमुख सचिन राकेश सौदाई (वय-३६, रा.साईनाथ सोसायटी, फ्लॅट नं. २४, बि. नं. २०, अशोक थिएटर जवळ, पिंपरी, पुणे., सनी ऊर्फ नितीन राकेश सौदाई (वय-३०, रा. साईनाथ सोसायटी, फ्लॅट नं.२४, बि. नं. २०, अशोक थिएटर जवळ, पिंपरी, पुणे), अजय विजय टाक (वय- २६, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी,पुणे), अनिल ऊर्फ बाबा ऊर्फ गोऱ्या सुशिल पिवाल (वय- ३१, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी, पुणे), तरुण ऊर्फ मोनु बिपीन टाक (वय- ३० वर्षे, रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी,पुणे), जतिन ऊर्फ सोनु मुकेश मेवाती, वय- २१ वर्षे, रा. बोपखेल, पुणे), तौसिफ सय्यद अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
या सर्व आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९) मोक्का अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उप-महानिरीक्षक तथा अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याकडे पाठविला होता.
पोलीस उप-आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा (अति.कार्य.) डॉ. संजय तुंगार यांनी सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला असता आज (११ मे) रोजी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मंचक इप्पर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, यांचे मार्गदर्शनाखाली, डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा (अति.कार्य.), मिलिंद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरूध्द सावर्डे, पोलीस उप-निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पो.हवा. अनिल गायकवाड, पो.ना. विष्णू भारती व पो.शि. ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group