पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनमध्ये सर्वांचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. हातावरचं पोट असलेल्या गोरगरिब नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. उद्या मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण असल्यामुळे त्यांनाही सण साजरा करता यावा या उद्देशाने सामाजिक बांधिलकी म्हणून पिंपरी युवासेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांना मदतीचा हात देण्यात आलायं.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीनुसार सामाजिक एकोपा व शांततेची शिकवण देणारा पवित्र रमजान ईद हा सण सर्व मुस्लिम समाज बांधवांना साजरा करता यावा, या हेतूने पिंपरी युवासेना विभागप्रमुख निलेश हाके यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांच्या घरी उद्या होणाऱ्या रमजान ईद निमित्त अन्नधान्य व शिरकुरमा साहित्य वाटप करण्यात आले व ईद निमित्त शुभेच्छा देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरीच राहून ईद साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group