पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने राजगुरूनगरमधील डीसीएचसी कोविड सेंटरला ८४० पीपी कीटस ५ हजार N95 मास्क,१० हजार सर्जिकल मास्क, १०० ऑक्सिमीटर भेट देण्यात आले.
हे साहित्य रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले. एंप्रो कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे ४ लाखाचे साहित्य दिले.
यावेळी रोटरी क्लब निगडीचे माजी अध्यक्ष विजय काळभोर, सेवा संचालक मुकुंद मुळे, मरकळ येथील एंप्रो इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकृष्ण करकरे, सीएसआर विभागप्रमुख कल्याणी कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज आदी उपस्थित होते.
हे वैद्यकीय साहित्य चाकण, चांडोली,म्हाळुंगे,देहूगाव, आळंदी शासनाच्या कोविड सेंटरला वाटप केले जाईल.






















Join Our Whatsapp Group