पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत चिंचवड येथील प्रीमियर प्लाझा मॉलमधील विवांत फॅमिली थाई स्पा सेंटरवर छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरच्या आडून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून कारवाई केली. छाप्यात स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी स्पा चालक शहानवाज रिफाई याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमधील अमोल जाधव हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. तसेच दोन पीडित महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक ती मदत व संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरातील स्पा, मसाज पार्लर आणि तत्सम आस्थापनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




















Join Our Whatsapp Group