पिंपरी (Pclive7.com):- शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या दि.२२/०५/२०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. तसेच उद्या दि.२२/०५/२०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील केंद्रावर ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लस वय वर्षे ४५ पुढील ज्या नागरिकांना देण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यंत) देण्यात येणार आहे. तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने उद्या दि.२२/०५/२०२१ रोजी फक्त वय वर्षे ४५ पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा तसेच ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
● ‘कोविशिल्ड’ लस पहिला व दुसरा डोस :- यमुनानगर रुग्णालय, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन आकुर्डी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना.
● ‘कोव्हॅक्सिन’ लस फक्त दुसरा डोस :- नविन भोसरी रुग्णालय, आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी रुग्णालय जवळ, यमुनानगर रुग्णालय, तालेरा रुग्णालय या ठिकाणी मिळेल.
तसेच वरील लसीकरण केंद्रावर वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थ्यांनी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.






















Join Our Whatsapp Group