पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी दि.२३) रोजी ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस ६५ केंद्रांवर देण्यात येणार आहे. एका केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान (८४ ते ११२ दिवस) देण्यात येणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही.
‘या’ ६५ केंद्रांवर मिळणार लस !
गंगोञी पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा चर्होली, बासकेट बॉल ग्राऊड स्पाईन रोड मोशी, पिंपळे गुरव माध्यमीक शाळा, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शंकुतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, कासारवाडी दवाखाना, बालाजी लॉन्स नदी शेजारी जुनी सांगवी, खिवंसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिंपळे निलख दवाखानाजवळ, पिं. चिं. मनपा शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेणु कस्पटे कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटे वस्ती वाकड, पिं.चिं.मनपा यशवंतराव प्रथमिक शाळा ग प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटिल प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव-३३, भाटनगर दवाखाना पिंपरी, पिं. चिं. मनपा. शाळा ,पवनानगर, काळेवाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिं. चिं. मनपा. शाळा राहटणी, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, नवीन जिजामाता रुग्णालय-१, फकीर भाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, तालेरा रुग्णालय- १ & २ चिंचवड, मनपा शाळा किवळे, मानसरोवर गुरुव्दारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल पुनावळे, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, सेक्टर नं.२९ मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडीकल फाऊंडेशन मोरया हॉस्पीटल चिंचवड, प्रेमलोक पार्क दवाखाना, मनपा शाळा वाल्हेकरवाडी. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मिळणार आहे.
























Join Our Whatsapp Group