पिंपरी (Pclive7.com):- कोव्हिडच्या प्रार्दुभावामुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे बरेच वकिल बांधव व जवळचे नातलग दगावले आहेत. उद्भवलेल्या या परिस्थितीचे भान ठेऊन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे ऑडिटर धनंजय कोकणे यांनी यावर्षी वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना काळात न्यायालयात उपयोगी पडणारे ५० लिटर हँड सॅनिटायझर व टेम्परेचर गन वकिल बांधव व न्यायालयातील कर्मचारी, पक्षकार यांच्या वापरासाठी देण्यात आले. या उपक्रमासाठी सिनिअर वकिल, आजी-माजी अध्यक्ष कमिटीतील सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन मिळाले.
कोरोनामुळे अनेक ज्युनियर वकील मित्रांची परिस्थिती ही खूप हलाखीची झालेली आहे. यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनला अन्न-धान्य किट करिता ॲडव्होकेटस् वेलफेअर फंडाला ११,०००/- रु धनादेश बारचे विद्यमान अध्यक्ष ॲड.गोरखनाथ झोळ यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी पिंपरी न्यायालायचे न्यायाधीश पठाण सर, सरकारी वकिल ॲड.साधना बोरकर, महाराष्ट्र अँड गोवा बारचे शिस्तपालन समिती सदस्य ॲड.अतीश लांडगे, बारचे सचिव ॲड.महेश टेमगिरे, मा.महिला सचिव ॲड.सविता तोडकर, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस NSUI चे उपाध्यक्ष ॲड.उमेश खंदारे, बारचे सदस्य ॲड.मंगेश नढे, ॲड.विश्वेश्वर काळजे तसेच पिंपरी न्यायालयाच्या नाझर काळे मॅडम आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group