पिंपरी (Pclive7.com):- भोसरी एमआयडीसी परिसरात मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण बाहेर फिरणाऱ्या ७० नागरिकांवर भोसरी एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे.
संपुर्ण जगात कोराना सारख्या भंयकर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याला आटकाव करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचे उल्लंघन करुन सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण पीसीएनडीटीए सर्कल, मोशी प्राधिकरण मोशी पुणे येथे फिरणाऱ्या एकुण ७० नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
त्या नागरिकांना भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणुन कोरोना विषाणुचे गांभिर्य समजावुन सांगितले. तसेच लॉकडाऊनचे महत्व समजावून सांगुन त्यांच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडुन एकुण ३५ हजार रुपये दंड वसुल करुन त्यांना योग्य त्या सुचना देवुन सोडुन देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर परि -०१, सहाय्यक पोलीस आयुक्त.डॉ.सागर कवडे, MIDC भोसरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे, पोलीस अंमलदार दिनेश मुंडे, पुना हगवणे, जयदीप खांबट, सागर कोळी, सुनिल कोळी यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group