पिंपरी (Pclive7.com):- मुंबई मनपा आणि पुणे मनपाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात ‘ड्राईव्ह इन’ व्हॅक्सिन व ‘व्हिल ऑन’ व्हॅक्सिन चालू करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे. मिसाळ यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत असून कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी मनपाकडून शासकीय नियमाप्रमाणे नागरीकांना लस देण्याची व्यवस्था शहरात सुरु करण्यात आलेली आहे.
शहरात वयोवृध्द नागरीक त्याच प्रमाणे विकलांग नागरिकांना लसीकरण केंद्रावर येऊन लस घेणे त्रासदायक होत आहे. या नागरिकांना रांगेत थांबणे शक्य होत नसल्यामुळे लसीकरण करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी वयोवृध्द व विकलांग नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शहरात मुंबई मनपाच्या धर्तीवर वयोवृध्द नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिन तसेच विकलांग नागरीकांना व्हिल ऑन व्हॅक्सिन करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे या नागरिकांचे सुध्दा कोरोना लसीकरण होईल.
मुंबई, पुणे मनपाच्या धर्तीवर शहरातील वयोवृध्द नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व विकलांग नागरिकांसाठी व्हिल ऑन व्हॅक्सीन चालू करण्यात यावे अशी मागणी राजू मिसाळ यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group