पिंपरी (Pclive7.com):- युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ०७ जून ते १३ जून या कालावधीत हा सप्ताह संपन्न होणार असल्याची माहिती पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांनी दिली आहे.
सोमवार दिनांक ०७ जून रोजी दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करण्यात येईल. दिनांक ०८ जून रोजी रोजी कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येईल. दिनांक ०९ जून रोजी संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामधील रूग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे.
तसेच दिनांक १० जून रोजी लांडेवाडी येथील गरीब व मजदूर लोकांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे. दिनांक ११ जून रोजी पिंपळे गुरव येथील अंध आश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक १२ जून रोजी वाहतूक पोलीस स्टेशन भोसरी येथे मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येईल.
आणि या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक १३ जून रोजी दापोडी व फुगेवाडी मधील रिक्षा चालकांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात येईल, अश्या प्रकारे आदित्य जनसेवा सप्ताह असेल अशी माहिती निलेश हाके यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group