पिंपरी (Pclive7.com):- कोरोनावर सामान्य नागरिकांना उपचार, सोयी सुविधांसाठी खारीचा वाटा असावा म्हणून औद्योगिकनगरीतील सुमारे ४०० कामगार आणि पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी सुपूर्द केला.
यावेळी राजेंद्र जगताप म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या कठीण परिस्थितीत मोठ्या आत्मविश्वासाने संकटाशी सामना करत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. पिंपरी चिंचवड ही औद्योगिकनगरी म्हणून परिचित आहे. या नगरीतील कामगारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी केलेली आर्थिक मदत स्तुत्य आहे.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अभिषेक जगताप, आदिराज शितोळे, तानाजी जवळकर, तसेच पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे नामदेव वाहिले, विजय पाटील, सचिन पाटील, नरेंद्र जाधव, सुनील मामनकर, सुरेश पानसरे, महेश अंदील, बाळासाहेब पिल्लेवार, अर्जुन शिंदे, साहेबराव तुपे, शैलेश दिवेकर, विजय भोसले आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group