पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २८ जून ते ०४ जुलै पर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
देहू आळंदी परिसरामध्ये आषाढी पायी वारी निमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
या २८ जून ते ०४ जुलै कालावधीमध्ये देहू, आळंदी मधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक राहणार बंद राहणार आहे. या कालावधीत देहू-आळंदीकडे येणारी खासगी तसेच सरकारी प्रवाशी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, यात्रीभवन, लॉज, हॉटेल व मठात वारकरी आणि इतर मनुष्यास निवासास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तर पवित्र इंद्रायणी घाटावर २० जुलैपर्यंत फिरण्यास तसेच स्नान करण्यास मज्जाव केला आहे. अत्यावश्यक सेवा तसेच सोहळा पासधारकांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
या गावांमध्ये संचारबंदी असेल..
देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील १) देहुगाव नगरपंचायत हद्द. २) येलवाडी, ३) माळवाडी, ४) तळवडे, ५) चिंचोली, ६) सांगुर्डी, आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील १) आळंदी, २) केळगाव, ३) च-होली खुर्द, ४) चिंबळी, ५) वडगाव घेनंद, ६) कोयाळी तर्फे चाकण, ७) धानोरे, ८) सोळू, ९) मरकळ, १०) च-होली बुद्रुक, ११) डुडुळगाव, १२) चोवीसावाडी तसेच देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीतील १) देहुगाव नगरपंचायत हद्दू, २) येलवाडी, ३) माळवाडी, ४) तळवडे, ५) चिंचोली, ६) सांगुर्डी, आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील १) आळंदी, २) केळगाव, ३) च-होली खुर्द, ४) चिंबळी, ५) वडगाव घेनंद, ६) कोयाळी तर्फे चाकण, ७) धानोरे, ८) सोळू, ९) मरकळ, १०) च-होली । च-होली बुद्रुक, ११) डुडुळगाव, १२) चोवीसावाडी या गावांमध्ये दि. २८/०६/२०२१ ते दि. ०४/०७/२०२१ या कालावधीत धर्मशाळा, मठ, भक्तनिवास, यात्रीभवन, हॉटेल, लॉजेस इत्यादीमध्ये भाविक / नागरिक यांना वास्तव्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.