पिंपरी (Pclive7.com):- बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पिंपरी चिंचवड शहरात आज वृक्षारोपण कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले होते.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे आज दापोडी, सांगवी, लांडेवाडी, भोसरी, दिघी, चिखली तसेच विकासनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक विक्रांत लांडे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजलभाई शेख, अरुण बोऱ्हाडे, प्रकाश सोमवंशी, सारिकाताई पवार, अजय चव्हाण, पोपट पडवळ, उज्वला ढोरे, माहेश्वरी परान्डे, राधिका घोडके, मनिशा पूरी, कोमल कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अंध शाळेतील मुलांचाही सहभाग होता. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष वर्षा जगताप तसेच ऋतुजा बिराजदार, नेहा पडवळ लालबी शेख लोखंडे, शलाका बनकर, सोनाली घाडगे, श्रद्धा कुटे, तृप्ती गोरे, राजश्री आहिरे, अंकिता इथापे, भव्यशीला गायकवाड, रविराज काळे यांनी केले होते.