पिंपरी (Pclive7.com):- देहू-आळंदी वारी मार्गावर तळवडे येथे वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला साजेसे महाप्रवेशद्वार साकारले जाणार आहे. यासाठी विशेष पाठपुरावा केल्याबद्दल श्री संत तुकाराम महाराज संस्थांन देहू यांच्या वतीने नगरसेवक पंकज भालेकर यांचा आज सन्मान करण्यात आला. वारिकाळात पंकज भालेकर यांच्या हस्ते महापुजा करण्याचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प नितीन महाराज मोरे, मा. विश्वस्त ह.भ.प.रामभाऊ महाराज मोरे, श्री वैभव मोरे, श्री प्रकाश मोरे व श्री बाळासाहेब पानसरे उपसरपंच निघोजे इ. मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने व नगरसेवक पंकज भालेकर यांच्या संकल्पनेतून व विशेष पाठपुराव्याने देहू आळंदी वारी मार्गावर तळवडे येथे म.न.पा हद्दीत महाप्रवेशद्वार उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच येथे वारकरी सांप्रदायाच्या परंपरेला साजेसे महाप्रवेशद्वार साकारले जाणार आहे. यासाठी विशेष पाठपुरावा केल्याबद्दल श्री संत तुकाराम महाराज संस्थांन देहू यांच्या वतीने नगरसेवक पंकज भालेकर यांच्या हस्ते वारिकाळात महापुजा करण्याचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group