पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतुन व रणजित (आबा) कलाटे फाउंडेशनच्या माध्यमातून वाकड परिसरातील १० हजार कुटूंबांना छत्री वाटप करण्यात आले.
माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा हस्ते हे छत्री वाटपाची सुरूवात करण्यात आली असून कोकणातील महाड येथील पूरग्रस्तांना ५१ हजार रुपयांचा धनादेश यावेळी सुपूर्द करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, आमचे सहकारी मित्र संतोष कलाटे व त्यांचे बंधु रणजित आबा कलाटे आणि स्नेहा रणजित कलाटे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हूणन आजपासून वाकड परिसरातील १० हजार कुटूंबांना छत्र्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच कोकणातील महाड येथील पूरग्रस्तांना ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात येत आहे.
खरतर ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे काही तरी देणे लागतो, या उदात्त भावनेने आजचा हा असा सुंदर उपक्रम त्यांनी राबविला आहे. त्यामुळे त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. येणाऱ्या दिवसात रणजित आबा कलाटे व स्नेहा रणजित कलाटे यांना कोणतीही जबाबदारी दिली तर ते ती उत्तमरित्या पार पडू शकतात याची मी ग्वाही देतो असे शंकर जगताप शेवटी बोलताना म्हणाले.
यावेळी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, विद्यमान नगरसेविका ममता गायकवाड, नगरसेवक संदीप कस्पटे, पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला गावडे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, विशाल अप्पा कलाटे, शिवशक्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष विजय कलाटे, संतोष कलाटे, रामदास कस्पटे, हिरामण कस्पटे, विष्णू कस्पटे, मुकेश कस्पटे, दिलीप कस्पटे, बाळासाहेब मानकर, विजय कस्पटे, वनिता कस्पटे, अश्विनी कलाटे, स्नेहा कलाटे, पूजा बुचुडे, विकास मानकर, मंगेश मानकर, राजू कस्पटे, प्रसाद कस्पटे, विठ्ठल कलाटे, पोपट कलाटे आदींसह वाकड मधील असंख्य जेष्ठ नागरिक पुरुष व महिला आणि युवकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगेश सुपेकर यांनी केले शेवटी आभार रणजित आबा कलाटे यांनी मानले.
























Join Our Whatsapp Group