पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या १० व्या दिवशी शहरातील एकूण ५९ हजार ५६६ गणेश मूर्तींचे संकलन व विसर्जन करण्यात आले. तसेच १२१ टन निर्माल्य संकलन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
अ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे २ हजार ९८१, ब क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ९ हजार १८३, क क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ३ हजार ४२३, ड क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ३ हजार ४४६, इ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ७ हजार ७२४, फ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे १७ हजार १४५, ग क्षेत्रीय कार्यालयाद्वारे १० हजार ३१५, ह क्षेत्रीय कार्यालयाद्वारे ५ हजार ३४९ गणेश मूर्तींचे संकलन व विसर्जन करण्यात आले.























Join Our Whatsapp Group