पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव व पिंपरी परिसरामधील नागरिकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी कृत्रिम तलावास पसंती दिली अशी माहिती नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले की, पिंपरीगाव व पिंपरी परिसरामधील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करता यावे याकरिता भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे, माजी नगरसेवक अरुण टाक, समर्थ हनुमान मंडळाचे अध्यक्ष संदीप कापसे यांच्या वतीने गणेश मूर्ति विसर्जन व संकलन केंद्राचे आयोजन करण्यात आले होते.
सदर ठिकाणी आरतीसाठी मंडप व्यवस्था, शुद्ध पाण्याचे कृत्रिम हौद देखील तयार करण्यात आले होते. यासर्व ठिकाणी जवळपास ३००० पेक्षा जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन व संकलन करण्यात आले.
सदर ठिकाणी विसर्जित व संकलित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती हिंजवडी येथील महापालिकेने ठरवून दिलेल्या खाणीमध्ये वाहतूक करून विसर्जित करण्यात आलेल्या असून कार्यक्रमास संदीप वाघेरे युवा मंच, शिवराज्य ग्रुप यांचे सहकार्य मिळाले. अशी माहिती संदीप वाघेरे यांनी दिली.