पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये एका गाईने चक्क दोन तोंडाच्या गोंडस वासराला जन्म दिलाय. हे वासरु पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीय. खिल्लारी जातीच्या गाईने या दुर्मिळ वासराला जन्म दिलाय. सध्या या वासराची प्रकृती ठणठणीत आहे.
वासराला पाहण्यासाठी लोकांची गर्दी
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पिंपरी गावामध्ये गणेश कापसे यांची पाळीव गाय प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर वासराला चक्क दोन डोके असल्याचे गायीच्या मालकाच्या लक्षात आले. ही घटना समजताच पिंपरी चिंचवड परिसरात ही बातमी वाऱ्यासरखी पसरली. गाईच्या या वासराला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
उभे राहण्यास वासराला अडचण
परंतु या वासराला असलेली दोन तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे आगावीच्या डोक्याचे वजन वासरु पेलू शकत नाहीये. तसेच दोन डोक्यांचे वजन जास्त झाल्यामुळे वासराला उभे राहण्यास अडचणी येत आहेत.
वासराला दोन तोंड, चार डोळे
या वासराला चार डोळे आहेत. त्याचे चारही डोळे सोबतच बंद होतात तसेच उघडतात. दोन डोकी एकमेकांना जोडलेले असल्याने दोन्ही बाजूला दोनच कान आहेत. वासराचे दोन्ही तोंडे स्पष्टपणे दिसतात. शरीराच्या तुलनेत मान मोठी असल्याने वासराला उभे राहण्यास कशाचातरी आधार घ्यावा लागत आहे.























Join Our Whatsapp Group